नगर – अखिल महाराष्ट्र लोकनाट्य व सांस्कृतिक थिएटर मालक संघटनेच्या कायदेविषयक सल्लागारपदी ऍड. डॉ. अरुण जाधव तर प्रसिद्धी प्रमुखपदी भगवान राऊत यांची निवड करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील राजलक्ष्मी सांस्कृतिक कला केंद्राच्या सभागृहात झालेल्या संघटनेच्या राज्यव्यापी बैठकीत संघटनेच्या अध्यक्षा केशरबाई घाडगे, कार्याध्यक्ष राजाभाऊ कचरे व चिटणीस बाळासाहेब काळे यांनी हे नियुक्तीपत्र जाधव व राऊत यांना प्रदान केले.
कायदेविषयक अभ्यास, वकीली क्षेत्राचा अनुभव व धरणे, आंदोलने, मोर्चे, उपोषणे, या लोकशाही मार्गाने प्रश्न सोडविण्याची हातोटी लक्षात घेऊन संघटनेने कायदेविषयक सल्लागार पदाची जबाबदारी ऍड. डॉ. अरुण जाधव यांच्यावर सोपवली आहे.
राज्याचा पारंपरिक लोककलांचा अभ्यास, लोककला, नाट्य, कला व सांस्कृतिक क्षेत्रातील अनुभव लक्षात घेऊन भगवान राऊत यांची निवड करण्यात आली आहे.
निवडीबद्दल प्रा.किसन चव्हाण, राजेंद्र उदागे, सुनिल गोसावी, शिवाजीराव देवढे, सुभाष लांडे, ऍड. कॉ. बन्सी सातपुते, उमेश घेवरीकर, शाहीर शेषराव पठाडे, कल्याण काळे, भारुड सम्राट हमीद सय्यद यांनी अभिनंदन केले आहे.