नगर – गुन्हा दाखल झालेल्या मनपा आरोग्य अधिकारी, अग्निशमन विभाग प्रमुख व कर्मचारी यांना तातडीने निलंबीत करण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आली. तर या गैरकृत्याचा निषेध नोंदवून मागणीचे निवेदन मनपा उपायुक्त संतोष लांडगे यांना देण्यात आले.
यावेळी समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष अजिम राजे, मोहंमद हुसेन व पदाधिकारी उपस्थित होते. महापालिकेचे जबाबदार अधिकाऱ्यांनी शहराला काळीमा फासणारे कृत्य केले आहे.
बोल्हेगाव येथील 14 वर्षीय शाळकरी मुलाच्या घरात घुसून मद्य प्राशन करुन महापालिकेचे अरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे, अग्निशमन विभाग प्रमुख शंकर मिसाळ, कर्मचारी बाळू घाटविसावे यांनी मारहाण करुन गच्ची वरुन फेकून देण्याचा प्रयत्न केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शहराला काळीमा फासनारी आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ निलंबित करा अशी मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.