- 3 जणांचा मृत्यू
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज 228 करोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर नवीन 216 करोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला.
महापालिकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, गुरुवारी (दि. 5) शहरात 216 जणांना करोनाची लागण झाली. आजपर्यंत शहरातील 2 लाख 65 हजार 393 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात मागील 2 बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासांत एका करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरातील 4351 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
दिवसभरात 228 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 60 हजार 144 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 4 हजार 843 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. किती रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत याबाबत महापालिकेने आकडेवारी जाहीर केली नाही.
सद्यस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 604 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 294 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 898 इतकी आहे.