वाघोली – तळेगाव ढमढेरे येथील बारा वर्षीय बालक सोहम सागर पंडित याने वैज्ञानिक क्षेत्रामध्ये उज्वल कामगिरी करत जगातला सर्वात कमी वजनाचा उपग्रह बनवला असून त्याच्या कार्याची दखल जागतिक रेकॉर्डने घेतली आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सोहमच्या उज्वल कामगिरीबद्दल त्याच्या घरी जाऊन गौरव करण्यात आला आहे.
तळेगाव ढमढेरे येथील बारा वर्षीय बालक सोहम सागर पंडित याने वैज्ञानिक क्षेत्रामध्ये उज्वल कामगिरी करत जगातला सर्वात कमी वजनाचा उपग्रह बनवला असून त्याच्या कार्याची दखल जागतिक रेकॉर्डने घेतली आहे.
सोहम याने गिनीजबुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, अशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, असिस्टंट वर्ल्ड रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन असे विविध रेकॉर्ड मिळविले आहेत. सोहम याच्या उज्वल कामगिरीबद्दल भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राज्याचे माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष विक्रांतदादा पाटील यांनी सोहमच्या घरी जावून त्याचा गौरव केला आहे.
भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालय मुंबई या ठिकाणी विक्रांतदादा पाटील यांच्या हस्ते सोहमाला ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन युवा मोर्चाच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी राज्याचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अनुपदादा मोरे, युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य पंडीत भुजबळ, महाराष्ट्र प्रदेश सदस्य गणेश कुटे, आत्मनिर्भर भारत विषयाचे राज्याचे संयोजक हर्षल विभांडीक, तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत सदस्य मनोज आल्हाट, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गायकवाड, सोहमचे वडील सागर पंडित, सचिन खोले आदि मान्यवर उपस्थित होते.