नगर – करोना काळात शहरातील रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांवर महापालिका आणि पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील सर्जेपूरा चौक, चाणक्य चौक तसेच एकविरा चौकात पोलिसांना वाहन चालकांवर कारवाई करत दंड वसूल केला आहे.
दुचाकी आणि चारचाकी वाहनातून प्रवास करताना कोणतेही नियम पाळले जात नाहीत. तोंडाला मास्क न लावता प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सायंकाळी 7 वा. नंतर संचारबंदी असून 5 वा. दुकाने बंद करण्याचे आदेश आहेत. असे असताना अनेक जण यावेळेनंतरही शहरातील रस्त्यांवर फिरताना दिसत आहते.
अशा विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईची माहिम प्रशासनाने हाती घेतली असून शहरातील एकविरा चौकात पोलिसांनी अनेक वाहनचालकांवर दंडात्मक दुचाकीवर डबल, ट्रिपल सिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई केली. या मोहिमेत महापालिकेचे अभियंता परिमल निकम, बाळासाहेब पवार, अविनाश हंस, गणेश आनंद, राहूल साबळे, रविंद्र सोनवणे, पोलीस कर्मचारी संभाजी बडे यांनी केली.