मांडवगण फराटा (प्रतिनिधी) – शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील ६५ वर्षीय करोना संसर्गित पुरुषाचा उपचारादरम्यान ससून रुग्णालयात मृत्यू झाला असल्याची माहिती मांडवगण फराटा आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डाॕ.मंजुषा सातपुते-इसवे यांनी दिली.
या संदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले की,मांडवगण फराटा येथील ६५ वर्षीय व्यक्ती आजारी असल्याने ते उपचारासाठी अहमदनगर येथे जात होते.यावेळी ताप येत असल्याने त्यांची करोना चाचणी करण्यात आली होती.यामध्ये सदर पुरुषाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी दि.२५ जुलै रोजी पुण्यातील ससुन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ससून रुग्णालयात गेले ४ दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते.
उपचारदरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कोविड अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. आज (दि.२९) रोजी सकाळी त्यांचे निधन झाले, असे डाॕ.मंजुषा सातपुते यांनी सांगितले.