नगर -जिल्ह्यात आज तब्बल 834 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 38 हजार 365 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 88.50 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजल्यापासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णसंख्येत 790 ने वाढ झाली असून, जिल्ह्यात बाधितांची संख्या 43 हजार 349 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 134, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 250 आणि अँटिजेन चाचणीत 406 रुग्ण बाधित आढळले. यामध्ये मनपा 32, अकोले 1, कर्जत 7, कोपरगाव 1, नगर ग्रामीण 22, पारनेर 10, पाथर्डी 10, राहुरी 2, शेवगाव 8, श्रीगोंदा 13, श्रीरामपूर 15, कॅन्टोन्मेंट 1, मिलिटरी हॉस्पिटल 11 आणि इतर जिल्हा 1, अशा रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 250 रुग्णांची नोंद एकूण रुग्णसंख्येत घेण्यात आली. यामध्ये मनपा 69, अकोले 2, जामखेड 3, कर्जत 4, कोपरगाव 9, नगर ग्रामीण 33, नेवासे 16, पारनेर 11, पाथर्डी 12, राहाता 17, राहुरी 16, संगमनेर 10, शेवगाव 13, श्रीगोंदा 4, श्रीरामपूर 24, कॅन्टोन्मेंट 7, अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत आज 406 जण बाधित आढळून आले. यामध्ये मनपा 23, अकोले 51, जामखेड 35, कर्जत 34, कोपरगाव 13, नगर ग्रामीण 1, नेवासा 37, पारनेर 41, पाथर्डी 17, राहाता 34, राहुरी 32, संगमनेर 31, शेवगाव 26, श्रीगोंदा 14, श्रीरामपूर 15 आणि कॅन्टोन्मेंट 2, अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज 834 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा 175, अकोले 36, जामखेड 41, कर्जत 31, कोपरगाव 44, नगर ग्रामीण 87, नेवासे 30, पारनेर 40, पाथर्डी 63, राहाता 65, राहुरी 56, संगमनेर 53, शेवगाव 23, श्रीगोंदा 37, श्रीरामपूर 26, कॅन्टोन्मेंट 13, मिलिटरी हॉस्पिटल 14, अशा रुग्णांचा समावेश आहे.