#IPL2020 : पुरनच्या क्षेत्ररक्षणाचे सचिनकडून कौतुक

शारजा – किंग्ज इलेव्हन पंजाबचा खेळाडू निकोलस पुरन याने सीमारेषेवर केलेल्या अफलातून क्षेत्ररक्षणाला सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येने लाईक्‍स मिळाल्या आहेत. मी आजवर पाहिलेले सर्वोत्तम क्षेत्ररक्षण, अशा शब्दात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही पुरनच्या कामगिरीचे कौतुक केले. 

राजस्थाननिरुद्धच्या या सामन्यात राजस्थानचा आक्रमक फलंदाज संजू सॅमसन याने फटकावलेला चेंडू षटकारच जाणार होता. मात्र, त्याचवेळी पुरनने सीमारेषेवर अफलातून डाईव्ह मारून चेंडू पुन्हा सीमारेषेच्या आत मैदानात लोटला. त्यामुळे हा षटकार ठरला नाही व सॅमसनला केवळ एका धावेवर समाधान मानावे लागले. त्याच्या या जबरदस्त क्षेत्ररक्षणाला लाखो चाहत्यांनी लाईक्‍स केल्या आहेत.

जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक जॉन्टी ऱ्होड्‌स यांच्या मार्गदर्शनाखाली पंजाबचा संघ सराव करत असल्याने पुरनच्या कामगिरीमागे त्यांचाच हात असल्याचे सिद्ध झाले. हा सामना जरी पंजाबने गमावला असला तरीही त्यात पुरनच्या कामगिरीची चर्चा जास्त झाली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.