नवी दिल्ली – बहुजन समाज पक्षाचे सहा आमदार राजस्थान विधानसभेवर निवडून आले आहेत. त्या सर्व सहा आमदारांनी काही महिन्यांपूर्वीच कॉंग्रेसमध्ये आपला पक्ष विलीन केला आहे. तरीही मायावती यांच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षाने त्यांना गेहलोत सरकारच्या विरोधात मतदान करण्याचा व्हीप जारी केला आहे. त्यामुळे फूट पडल्याने आधीच अडचणीत आलेल्या कॉंग्रेस सरकारसमोर अडचणी वाढल्या आहेत.
कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी बहुजन समाज पक्षाच्या राजस्थानातील भूमिकेवरून त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी ट्विटरवरून ही टीका करताना मायावती यांचे नाव घेतलेले नाही, पण त्यांचा उल्लेख “भाजपच्या अघोषित प्रवक्त्या’ असा केला आहे.
भाजपच्या अघोषित प्रवक्त्याने राजस्थानात भाजपच्या बाजूने व्हीप जारी केला आहे. हा व्हीप नाही तर ज्यांनी लोकशाही आणि घटनेची हत्या केली आहे त्यांना क्लीन चीट देण्याचाच हा प्रकार आहे.
– प्रियांका गांधी, कॉंग्रेस
भाजपा के अघोषित प्रवक्ताओं ने भाजपा को मदद की व्हिप जारी की है। लेकिन ये केवल व्हिप नहीं है बल्कि लोकतंत्र और संविधान की हत्या करने वालों को क्लीन चिट है।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) July 28, 2020