शिरूर -शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आजपासून शेतकरी बाजार सुरू झाला आहे. सोशल डिस्टन्स, मास्क वापरून नियमांचे पालन करण्यात आले होते. या बाजारास शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे.
करोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमध्ये दीड महिन्यापासून शेतकरी बाजार बंद होता. बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे, उपसभापती विश्वासराव ढमढेरे व संचालक मंडळाने नियोजन करीत बाजार सुरू केला आहे.
सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत हा बाजार सुरू असणार आहे. 70 ते 80 वाहनातून शेतीमाल विक्रीसाठी आणला होता. संचालक बंडु जाधव, सचिव अनिल ढोकले, लिपिक जयवंत दंडवते यांनी सूचना केल्या.