पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – ध्रुव ग्लोबल स्कूलने आता दुबई येथे देशाबाहेरील पहिली शाळा, तसेच औंध व बाणेर येथे या वर्षापासून बालवाडीचे वर्ग सुरू करीत आहे, अशी घोषणा ध्रुव ग्लोबल स्कूलच्या शालेय संचालिका अनिष्का मालपाणी व मालपाणी ग्रुपचे संचालक यशोवर्धन मालपाणी यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
ध्रुव ग्लोबल स्कूल भविष्यात नवी शाळा सुरू करण्याबरोबरच नवे विद्यापीठ सुरू करण्याचा विचार करीत आहे, तसेच येणार्या काळात अधिक वेगाने पुढे जाण्यासाठी व अध्ययन- अध्यापन पद्धतीत सातत्यपूर्ण गुणवत्तावृद्धीसाठी या क्षेत्रात चांगले काम करणार्यांसोबत भागीदारी करण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत.
स्कूलच्या विस्तार योजनेचा भाग म्हणून दुबई येथे देशाबाहेरील पहिली शाळा या वर्षी सुरू केली आहे, तसेच औंध आणि बाणेर परिसरात या वर्षीपासून ध्रुवतर्फे बालवाडीचे नवीन वर्गही सुरू करीत आहोत.
ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, क्रीडा व योगाच्या क्षेत्रात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. याची दखल कॅलिफोर्निया, बोस्टनसारख्या जगातील शीर्ष विद्यापीठांनी घेतली आहे, अशी माहिती यशोवर्धन मालपाणी यांनी दिली.
विद्यार्थ्यांनी स्वयंप्रज्ञेने विचार करावा. आपल्या मूल्यांची जपणूक करीत सखोल ज्ञान संपादन करत ते समाजातील सर्वच क्षेत्रांत नेतृत्व करण्यास सज्ज असावे. अशा प्रकारचे शैक्षणिक वातावरण निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असे अनिष्का मालपाणी म्हणाल्या.