शिरूर (प्रतिनिधी) – शिरूर-हवेली तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र येथील कर्मचाऱ्यांना शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी आमदार निधीतून 50 लाख रुपयांचे कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षतेसाठी विविध साहित्यांचे वाटप करण्यासाठी निधी द्यावा अशी मागणी करणारे अशोक पवार राज्यातील पहिले आमदार असून, त्यांनी केलेल्या मागणीला राज्य मंत्रिमंडळाने होकार दिला आहे. 50 लाख रुपयांचा निधी आमदार अशोक पवार यांनी कोविड-19 साठी शिरूर हवेली तालुक्यात कर्मचाऱ्यांना कुठलीही अडचण येऊ नये व त्यांची काळजी म्हणून सर्वच्या सर्व निधी आमदार ॲड. अशोक पवार यांनी आरोग्य कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी खर्च केला आहे.
आज परिचारिका दिनाचे औचित्य साधून आमदार अशोक पवार यांनी या साहित्य वाटपाचा शुभारंभ शिरूर येथील प्रसिद्ध नेत्रतज्ञ स्वप्निल भालेकर यांच्या हस्ते शिरूर ग्रामीण रुग्णालय येथून सुरू केला आहे.
यावेळी शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, शिरूर येथील प्रसिद्ध नेत्रतज्ञ स्वप्निल भालेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष संतोष भंडारी, महिला अध्यक्ष पल्लवी शहा, युवक अध्यक्ष रंजन झांबरे, युवती अध्यक्षा संगीता शेवाळे, शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी रोकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे, राष्ट्रवादी वकील सेलचे अध्यक्ष ॲड रवींद्र खांडरे, वैद्यकीय अधिकारी कैलास बत्ते, पी ए प्रदीप जाधव, राजेंद्र गिरमकर, तज्ञिका कर्डिले, कलीम सय्यद, चेतन यलभर उपस्थित होते .
शिरूर हवेली तालुक्यातील शिरूर ग्रामीण रुग्णालय, न्हावरे, शिक्रापूर, मांडवगण फराटा, करडे, निमोने, तळेगाव ढमढेरे,वाघोली, वाडेबोल्हाई, पेरणे, लोणीकाळभोर, कुंजीरवाडी, उरळीकांचन, कोविड-19 कक्ष या 14 ग्रामीण रुग्णालय, तालुका प्राथमिक रुग्णालय यांना एन-95 मास्क (15 हजार), थर्मामीटर (15), पीपीई किट(1000), ऑक्सीजन सिलेंडर बिग विथ ॲक्सेसरीज (20), ऑक्सीजन कॉन्सेन्ट्रेटर (5), अमुबॅग (10), पल्स सिऑक्साईमीटर (10), हॉस्पिटल बेड विथ मॅट्रेस (30), ईसिजी मशीन (3), ऑक्सीजन सिलेंडर मेडीयम विथ ॲक्सेसरीज (20) असे साहित्य आमदार निधीतून उपलब्ध करून दिले आहे.
“कोरोना व्हायरस संसर्ग महाराष्ट्र राज्यात झाला त्याच वेळेस आमदार अशोक पवार यांनी महाराष्ट्र शासनाकडे या आजाराविरूध्द लढण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुरक्षितेसाठी साहित्य मिळावे यासाठी निधी उपलब्ध करावा अशी मागणी केली होती. ही मागणी पूर्ण होऊन आमदार अशोक पवार यांनी आपल्या शिरूर-हवेली मतदारसंघात 50 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे व या निधीतून मोठ्या प्रमाणात आरोग्य कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप सुरू केले आहे. – नेत्रतज्ञ स्वप्निल भालेकर शिरूर
“शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी परिचारिका दिन या दिवशी मोठ्या प्रमाणात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी साहित्य वाटप सुरू केले आहे. असे साहित्य वाटप करणारे अशोक पवार हे पहिले आमदार आहेत. -ॲड. रवींद्र खांडरे, राष्ट्रवादी वकील संघटना, शिरूर तालुका
“समाजकल्याण विभागाने ग्रामीण रुग्णालयाला साहित्य वाटप केले होते, परंतु ते कमी असल्याने गरजेच्या वस्तूंचा आता आमदार अशोक पवार यांनी मोठ्या प्रमाणात पीपीई किट, एन 95 मास्क उपलब्ध करून दिले आहेत त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. -शंकरराव रोकडे, वैद्यकीय अधिकारी, शिरूर ग्रामीण रुग्णालय