कोल्हापूर- कोल्हापूरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज दिवसभरत 2 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले
करवीर तालुक्यातील केर्ले गावाचा 23 वर्षीय तरुण कोरणा पॉझिटिव्ह तर शाहूवाडी तालुक्यातील माणगाव मधल्या 20 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह दोघांची ट्रॅव्हल हिस्ट्री असून केर्लेचा तरुण तामिळनाडूतून तर माणगावचा रुग्ण मुंबईहुन कोल्हापूरात दाखल झाला होता
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी होते. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात होती. मात्र कोल्हापूरच्या ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा घट्ट होण्याची चिन्हे दिसत आहे. त्यामुळे आज कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 19 वर पोहचली