पुणे – करोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या काळात सर्वच प्रकारचे रोजगार उद्योग व्यवसाय बंद आहेत. यामुळे हातावर पोट असणाऱ्या गोर गरीब लोकांच्या जेवणाचे हाल होत आहेत. त्यांना मदत करण्यासाठी दांडेकर पूल येथील परिसरातील दोनशे गरीब लोकांना अन्नदान करण्यात येणार आहे.
कौटुंबिक न्यायालयातील वकिलांची संघटना असलेली दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन, अध्यक्ष अॅड. वैशाली चांदणे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने राबण्यात येणार आहे. अन्नदानाचा उपक्रम लोकडाऊनच्या शेवटच्या तारखेपर्यंत दररोज करण्यात येणार आहे.
या उपक्रमाबद्दल बोलताना ऍड. चांदणे म्हणाल्या, मध्यम वर्गीयांकडे कठीण काळात खर्चासाठी बँकेत काही रक्कम शिल्लक असते. वेतन व उद्योग, व्यवसायाचे पैसे शिल्लक असताना मात्र कागद, काच, पत्रा, वेचक, मोलकरीण, गोरगरीब, असंघटित कामगार त्यांच्याकडे मात्र कामाला गेले नाही. ५ एप्रिल पासून येत्या १४ तारखेपर्यंत उपक्रम करण्यात येणार आहे.