मुंबई : महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला एका भाविकाने सुमारे 35 किलो सोन्याचे दान दिले आहे. या सोन्याची किंमत बाजारात सुमारे 14 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील सर्वांधिक लोकप्रिय मंदिरापैकी एक आहे.
Maharashtra: A devotee from Delhi has donated gold plating weighing around 35 kg, worth around Rs 14 crores to Mumbai’s Shri Siddhivinayak Temple. pic.twitter.com/2eavuvJjmk
— ANI (@ANI) January 21, 2020
हे सोनं दिल्लीत राहणाऱ्या एका भक्ताने आठवड्यापूर्वी हे दान दिले आहे. सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईतील सर्वांधिक श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. दरवर्षी मंदिराला कोट्यवधींची देणगी मिळते.भाविकाकडून मिळालेल्या या 35 किलो सोन्यातून मंदिराचा गाभारा, दरवाजे व घुमटाला सोन्याचा पत्रा चढवण्यात आला. सोमवारपासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले झाले.
ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर म्हणाले, मंदिराच्या इतिहासात प्रथमच इतके मोठे सोन्याचे दान एखाद्या भक्ताने दिले आहे. गेल्या दोन वर्षांत मंदिराच्या दानात वाढ झाली असून 320 कोटींचे दान आता 400 कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे