Heat Wave in Kokan Region । राज्यात मागच्या काही दिवसापासून उष्णतेचा पारा ४० च्या पुढे गेला आहे. त्यातच आता येत्या 24 तासात राज्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, 30 एप्रिल रोजी राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
हवामानशास्त्र विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आलंय. त्यानंतर दोन दिवस राज्यात सामान्य वातावरण पाहायला मिळणार आहे. त्यानंतर 3 मेपासून पुन्हा राज्यात तापमान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हात बाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलं.
मुंबई, ठाणे, रायगडमध्ये उष्णतेची लाट Heat Wave in Kokan Region ।
राज्यात येत्या 24 तास महत्त्वाचे असून विभागाने मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट येणाचा अंदाज वर्तवलाय. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलंय. मुंबई हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, ठाणे, मुंबई, रायगड या भागात तापमान वाढण्याची शक्यता असून उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केलाय.
मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/aRn14ieJEH— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 29, 2024
काही भागात कोरडं वातावरण Heat Wave in Kokan Region ।
उत्तर कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यासोबतच पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात कोरडं वातावरण पाहायला मिळणार आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक. अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा या भागातही दमट आणि कोरडं वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता
एकीकडे राज्यात उन्हाचा कडाका पाहायला मिळत आहे, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
वाढत्या तापमानाचा मतदानावर परिणाम; निवडणूक आयोगाकडे वेळ बदलण्याची पक्षाची मागणी