ब्लूफाँटेन : भारतीय संघाने १९ वर्षाखालील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत ‘अ’ गटात सलामीच्या लढतीत श्रीलंकेवर ९० धावांनी दणदणीत विजय मिळवत आपल्या ‘मिशन वर्ल्ड कप’ ला थाटात सुरूवात केली. त्यानंतर आज भारतीय संघाची विश्वचषक स्पर्धेत जपानविरूध्द लढत होत आहे. ही लढत ब्लूफाँटेन येथे होणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होईल.
Training ✅
It's a big day for Japanese cricket today as they take on India in Bloemfontein in the U19 World Cup!#U19CWC | #FutureStars pic.twitter.com/kqaZceMqYs
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) January 21, 2020
जपान संघाची ही पदार्पणाची लढत स्पर्धा आहे. त्याच्या संघाकडे भारतीय संघाच्या तुलनेने कमी अनुभव असणार आहे. त्यामुळे ही लढत जिंकून भारतीय संघाला उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित करता येईल.
मागील श्रीलंकेविरूध्दच्या लढतीतील संघाची कामगिरी पाहता आजच्या लढतीत भारतीय संघात बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे. जपाननंतर भारताचा पुढील सामना २४ जानेवारी रोजी न्यूझीलंडविरूध्द होणार आहे.