मुंबई – पश्चिम बंगालधील राणावत रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचा आवाजातील गाणे गाणारी रानू मंडलचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी चांगलाच व्हायरल झाला होता. रानू मंडलच्या या व्हिडीओने तिला एका रात्रीत सुपरस्टार बनविले. रानू मंडल यांच्या ‘तेरी मेरी कहानी…’ या गाण्याने सामाजिक माध्यमांमध्ये चांगलीच पसंती मिळविली होती.
View this post on Instagram
#welcome @ranumondal.offical #asianet #asianetnews #love #support #india#comedystars
दरम्यान, या व्हिडीओमध्ये त्या अशाच एका शोमध्ये रानू यांनी आता हिंदी नाही तर मल्याळम गाणं गायलं त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रानू मंडल यांनी गेस्ट म्हणून एका मल्याळम कॉमेडी शोमध्ये हजेरी लावली त्यावेळी त्यांनी प्रेक्षकांच्या आग्रहासाठी एक मल्याळम गाणं गायलं.
त्यांच्या या गाण्याचा व्हिडीओ ऑफिशिअल इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला. त्यांचं हे पेज त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत त्यांना प्रसिद्धी मिळवून देणारा एतींद्र चक्रवर्ती चालवतो. रानू मंडल यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.