मुंबई – बॉलिवूडचा अॅक्शन, स्टंट स्टार विद्युत जामवालचा आगामी ‘कमांडो ३’ चित्रपट लवकरच सिनेप्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, काही दिवसांपूर्वी “कमांडो 3′ २९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, विद्युतने या चित्रपटातील एन्ट्री सीन आपल्या इन्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या एन्ट्री सीन व्हिडिओला शेअर करत लिहिले की,’यह तो शुरूवात है, २९ नोव्हेंबर को देखो होता है क्या?’
या एन्ट्री सीनमध्ये विद्युत जमवाल अगदी बॉलिवूड फिल्मी स्टाईलने फायटिंग करताना दिसत आहे. सध्या या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, आदित्य दत्तनी डायरेक्शन केलेल्या या सिनेमामध्ये अदह शर्मा, अंगीरा धर आणि गुलशन देवैय्याह हे देखील असणार आहेत.