नितेश तिवारीचा रामायण हा या काळातील सर्वात मोठा चित्रपट मानला जातो. एप्रिलच्या सुरुवातीपासून कलाकारांनी शूटिंग सुरू केले. रणबीर कपूरला रामच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते वाट पाहत होते. आता सेटवरून काही फोटो लीक झाले आहे. ज्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. मुंबईत रामायणाच्या शूटिंगसाठी भव्य सेट लावण्यात आला आहे. या सेटवरून फोटो लीक झाले आहे.लीक झालेल्या फोटोत साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत आणि रणबीर रामच्या भूमिकेत दिसत आहे.
रामायणाच्या सेटवरून लीक झालेल्या फोटोंमध्ये रणबीर रामच्या रुपात दिसत आहे. त्याने भगवा रंगाचा ड्रेस परिधान केला नसून मरून आणि जांभळ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे. गळ्यात सोन्याचा हार व बांगडी घातली आहे. साई पल्लवीही सीतेच्या वेशात खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर साधेपणा दिसून येतो.
View this post on Instagram
टीव्ही आणि चित्रपटांच्या रामायणात राम आणि सीता भगव्या रंगाच्या पोशाखात दिसतात. मात्र नितेश तिवारी यांनी आपल्या रामायणाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. साधेपणा जपण्यासोबतच कलाकारांना साधे लूकही देण्यात आला आहे.
अलीकडे, कैकेयीच्या भूमिकेत लारा दत्ता आणि मंथरा म्हणून शीबा चड्ढा यांची काही फोटो देखील सेटवरून लीक झाली होती. मुंबईत उभारण्यात आलेल्या भव्य सेटवर राम जन्म, गुरुकुल, राम-सीता विवाह असे काही महत्त्वाचे दृश्य चित्रीत करण्यात आले आहे. रावण आणि हनुमानाच्या भूमिका साकारणारे यश आणि सनी देओल जुलैपासून त्यांच्या भागांचे शूटिंग सुरू करणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रामायणचे पुढील शेड्यूल लंडनमध्ये शूट केले जाऊ शकते.