तळेगाव दाभाडे – येथील श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या वतीने स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या मामासाहेब खांडगे सभागृहामध्ये शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रसिद्ध मूर्तिकार कविता चव्हाण, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी व श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक संतोष खांडगे, डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ सचिव मिलिंद शेलार, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी सचिव दशरथ जांभुळकर, अनिल धर्माधिकारी, राहुल खळदे, विल्सन सालेर, शिल्पकार प्रसाद मोडक, ललित धनवे, ओंकार पवार उपस्थित होते.
शिल्पकार कविता चव्हाण यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष संतोष खांडगे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच ओंकार पवार यांनी शाडूच्या मातीच्या मूर्ती आणि प्लास्टर ऑफ पॅरिस यांच्यातील फरक समजावत सांगितला. या कार्यशाळेत एकूण 450 प्रशिक्षणार्थीनी सहभाग नोंदवला.