कोणावर विश्वास ठेवायचा समजत नाही

हॉलिवूडमधील प्रख्यात गायिका ब्रिटनी स्पिअर्सच्या जीवनामध्ये अनेक उतार-चढाव आलेले आहेत. तिने वेळोवेळी सोशल मीडिया वरून आपल्या आयुष्यातले कटू प्रसंग व्यक्त केले आहेत. आता पुन्हा एकदा ब्रिटनी स्पिअर्सने सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना योग्य साथीदार ओळखण्याचा हा सल्ला दिला आहे.

लोक बुरख्याआड लपलेले असतात. त्यांच्या खऱ्या चेहऱ्याला ओळखू न शकल्यामुळे आपल्या जीवनात एकटेपणा येऊ शकतो. असे फसवे लोक ओळखायला शिकले पाहिजे. विशेषतः अशा लोकांना ओळखायला हवे जे आपल्या यशानंतर आनंदित होत नाहीत, असं ब्रिटनीने इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

लॉस एंजलिसमध्ये राहणं हे एखाद्या न संपणाऱ्या प्रवासासारखे आहे. या प्रवासादरम्यान आपल्या वाट्याला एकाकीपण येऊ शकतो. आपण काही जणांवर भरोसा करतो. तर काही जणांवर भरोसा करणे ही आपली चूक ठरते. अशी चूक झाल्यावर कोणावरही विश्वास ठेवावा असे वाटत नसल्याचे ब्रिटनीने आपल्या या भावनिक पोस्टमध्ये म्हटले आहे.

आपलाही मित्रांचा एक छोटासा ग्रुप आहे. अशा ग्रुपमध्ये आपल्याला नेहमी भेटायला आवडते. मात्र आपल्या ग्रुपवर झालेल्या कॉमेंटमुळे दुःख झाल्याचे ब्रिटनीने म्हटले आहे. अशा कॉमेंट करणाऱ्या लोकांपासून दूर राहायला आपण शिकल्याचही ती म्हणाली. आपल्याबाबत झालेल्या कोणत्याही कॉमेंटकडे दुर्लक्ष करायला शिकल्याचे ती म्हणाली. जे लोक द्वेष करतात, त्यांना त्यांचे काम करू द्यावे. आपण त्यांच्या कामात आडकाठी बनू नये असेही ती म्हणाली.

तिच्या या अत्यंत भावनिक पोस्टवर तिचा बॉयफ्रेंड सॅन असगरीने एक कॉमेंट केली आहे. ही कॉमेंट म्हणजे जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आहे, “विजेता कोणाचीही घृणा करीत नाही, विजेता कधीही कोणालाही धमकावतही नाही. पराभूत होणारे लोक विजेत्याचा तिरस्कार करतात. कारण त्यांच्याकडे विजयी व्यक्तीप्रमाणे एक मौल्यवान गोष्ट नसते. ही मौल्यवान गोष्ट म्हणजे प्रेमाने भरलेले हृदय असते.’ असे असगरीने म्हटले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×