मुंबई – नवी मुंबईतील एमआयडीसी मधील नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू होते.
या आगीत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेचा अधिक तपशील अद्याप समोर आलेला नाही.
नवी मुंबईतील पावणे कोपर खैरणे एमआयडीसी येथे ही कंपनी आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. केमिकल कंपनीला आग लागल्याने किंवा ज्वाळा मोठ्या असल्यामुळे आग पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.
एमआयडीसी असल्याने जवळपास अनेक केमिकल कंपन्या आहेत. त्यामुळे खबरदारी घेतली जात आहे. अद्यापर्यंत यात कोणीही अडकल्याचे किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही.