‘बिग बॉस 13’मधून मोठे कलाकार बाहेर

हिंदी “बिग बॉस’चा 13 वा सीझन सुरू होण्यसाठी आठवड्याभरापेक्षा कमी वेळ राहिला आहे. शो मध्ये सहभागी होण्याच्या मानधनाच्या मुद्दयावरून अनेक कलाकारांनी “बिग बॉस’मध्ये सहभागी होण्यास नकार दिला असल्याचे समजते आहे.

गोपी बहू अर्थात देवोलिना भट्टाचार्य हे त्यातील प्रमुख नाव आहे. देवोलिनाने प्रत्येक आठवड्यांसाठी 80 हजार रुपयांच्या मानधनाची अपेक्षा केली होती. पण निर्मात्यांकडून प्रत्येक आठवड्याला 30 हजारांच्या मानधनाचीच तयारी होती. अंकिता लोखंडे आणि झरीन खानने दर आठवड्याला 1 लाख रुपयांची अपेक्षा केली होती. तर ब्रिटीश ऍडल्ट स्टार डॅनी डीने संपूर्ण सीझनसाठी 1 कोटी रुपये मागितले होते. ‘खतरोंके खिलाडी’ आणि “सारेगमप’ फेम सिंगर आदित्य नारायणने प्रत्येक आठवड्याला 1 ते 2 लाख रुपये मागितले होते. ही मानधनाची रक्कम परवडण्यासारखी नसल्याचे निर्मात्यांनी सांगितल्यावर या सगळ्यांनी “बिग बॉस 13’मध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×