Bharat on Google Maps : केंद्र सरकारकडून नुकतेच देशाचे नाव बदलून ‘भारत’ (Bharat) करण्याचे संकेत दिले आहेत. यावरून देशभरात बरेच राजकारण झाले. मात्र, तरीही देशाचे अधिकृत ‘इंग्रजी’ नाव बदलून ‘इंडिया’तून ‘भारत’ असे करण्यात आलेले नाही. पण गुगल मॅपने देशाच्या नवीन नावाचा स्वीकार केला असल्याचे दिसत आहे. कारण जर तुम्ही गूगल मॅपच्या सर्च बॉक्समध्ये भारत (Bharat)टाइप केला तर तुम्हाला तिरंगा ध्वज दिसेल ज्यावर ‘A country in South Asia’ लिहिलेले दिसत आहे.
देशातील वादग्रस्त मुद्दा असणारा भारत (Bharat)आणि इंडिया या नावात आता गुगल मॅपने उडी घेतली आहे. कारण गुगल मॅपमध्ये देशाचे नाव आता भारत असे दिसत आहे. तुमच्या गुगल मॅपची भाषा हिंदी आहे की इंग्रजी याने काही फरक पडत नाही. तुम्ही हिंदी किंवा इंग्रजीमध्ये India लिहिल्यास, Google तुम्हाला फक्त ‘भारत’ दाखवेल. Google Maps ने इंडिया आणि भारत (Bharat) या दोघांनाही ‘दक्षिण आशियातील एक देश’ म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे, जर वापरकर्त्यांना भारताचा अधिकृत नकाशा गुगल मॅपवर पाहायचा असेल तर ते इंग्रजी किंवा हिंदीमध्ये गुगल मॅपवर इंडिया किंवा भारत लिहून करू शकतात.
ही यंत्रणा कशी काम करते?
गुगल मॅपच्या हिंदी आवृत्तीवर तुम्ही भारत (Bharat)टाइप केल्यास तुम्हाला भारताच्या (Bharat)नकाशासोबत ठळक अक्षरात ‘भारत’ लिहिलेले दिसेल. त्याच बरोबर तुम्ही गुगल मॅपच्या इंग्रजी आवृत्तीवर जाऊन भारत लिहिल्यास सर्च रिझल्टमध्ये तुम्हाला देशाच्या नकाशासोबत भारत लिहिलेले दिसेल. म्हणजे गुगल मॅपही भारताला भारत म्हणून स्वीकारत आहे. सरकार नाव बदलण्याच्या प्रक्रियेत व्यस्त असताना, गुगलने आधीच आपले गृहपाठ सुरू केले आहे.
गुगलकडून बदलाबाबत कोणतेही स्पष्टीकरण नाही
फक्त गुगल मॅपवरच नाही तर टेक कंपनीच्या इतर प्लॅटफॉर्मवरही जर इंडिया आणि भारत (Bharat)त लिहिण्यात येत असेल तर त्याचे परिणाम अगदी सारखेच आहेत. जर वापरकर्ते गुगल सर्च, गुगल ट्रान्सलेटर, गुगल न्यूज सारख्या अॅप्सवर जाऊन इंडिया किंवा भारत (Bharat) टाईप केले तर त्यांना सारखेच उत्तर मिळत आहेत. मात्र, याबाबत गुगलकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. मात्र लवकरच त्यांच्या बाजूने निवेदन प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.