पुणे – पोलिसांकडून प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा जबाब नोंदविण्यास झालेला महिनाभर विलंब, साक्षीदाराची ओळख परेड न घेणे महागात पडले आहे. वाघोली येथील खून प्रकरणातील आरोपीला सत्र न्यायाधीश एस.बी.साळुंखे यांनी 50 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला आहे.
सागर मोहिते असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. अजित पवार आणि ऍड. प्रणित नामदे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.
वाघोली बाजारा तळाच्या ठिकाणी 30 मार्च 2023 रोजी एका अज्ञात युवकाचा मृतदेह सापडला होता.
या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी सागर मोहिते याला अटक केली. तो मयताला लाकडी दांडक्याने मारत असतान प्रत्यक्षदर्शी एका साक्षीदाराने बघितले होते. परंतु सदर साक्षीदारांचा जबाब नोंदविण्यात पोलिसांनी उशीर केला.
आरोपीस मयत यास मारण्याचा कोणताही उद्देश नव्हता. तसेच त्यांचे पूर्ववैमनस्य नव्हते. या गुन्ह्यात व सदर साक्षीदाराची ओळख परेड देखील पोलिसांनी घेतली नाही. या कारणास्तव सदर साक्षीदारांचा जबाब, तसेच हत्यार उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचा फायदा आरोपीस झाला