मुंबई – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत सोशल मिडियावर आक्षेपार्ह व अश्लिल टिप्पणी करणाऱ्या भाजप नेत्याला हद्दपार करण्याची कारवाई पोलिसांनी केली आहे. चंद्रपूर पोलिसांनी त्याला तब्बल वर्षभरासाठी तडीपार केलं आहे. ‘खेमचंद गरपल्लिवार’ असं या व्यक्तीच नाव आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अमृता फडणवीस यांनी वेश्या व्यवसायाला मान्यता देऊन तो अधिकृत करावा, असे वक्तव्य केलं होत. या वक्तव्यावर आक्षेप घेत चंद्रपूर जिल्ह्यातील खेमचंद गरपल्लिवार यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट टाकली होती. या पोस्टमुळे स्थानिक भाजप कार्यकर्ते नाराज झाले. त्यांनी पोलिसांत याची तक्रार केली. गोंडपिंपरी पोलीस स्टेशनमध्ये शिवीगाळ, धमकावणे, जमीन बळकावणे, विनयभंग या सारखे गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले आहेत.
अमृता फडणवीस काय म्हणाल्या होत्या….
पुण्यात भारतीय जनता महिला आघाडीच्या वतीने बुधवार पेठ येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित राहिलेल्या अमृता फडणवीसांनी देहविक्री करणाऱ्या महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे, नियमित तपासणी करावी, योगासने करावीत, असा सल्ला दिला.
आपल्या समाजामध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना खूप खालच्या पातळीची वागणूक दिली जाते. वेश्या व्यवसायाचा प्रोफेशन म्हणून स्वीकार व्हायला हवा. जर्मनीत या व्यवसायाकडे आदराने पाहिले जाते. मी त्यांच्या पाठीशी आहे, असं अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या.