मुंबई – दादरमध्ये शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या संघर्षानंतर मुंबई पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांचे परवाना असणारे पिस्तूल दादर पोलिसांनी जप्त केले असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे, यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांच्या मोठं विधान करत होणाऱ्या चर्चेला पुर्णविराम दिला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले,’मी आणि फडणवीस एकसे भले दोन आहोत. आणि आम्ही दोघे दो दिल एक जान आहोत. तुम्ही फक्त एवढ लक्षात राहू द्या. कारण, फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा पाच वर्षाचा अनुभव आहे. आता ते उपमुख्यमंत्री आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांनी आदेश दिल्या नंतर त्यांनी तो मानला. हा आदर्श आहे. एक मोठे उदाहरण आहे. अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी फडणवीसांचे कौतुकही केले. आणि फडणवीस नाराज असल्याच्या चर्चांनावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पैठण येथील सभा पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यामांशी संवाद साधला.