मुंबई – दोन वर्षाच्या कालावधीनंतर दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. त्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भाषणाची संधी हुकल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होत. त्यानंतर स्वतः अजित पवार यांनी घडलेल्या प्रकारावर भाष्य करत पक्षावर नाराज नसल्याचे स्पष्ट केले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी नाराजीसह बारामती मॉडेल आणि पवारांचा फोटो वापरण्याबाबत भाजप नेत्याच्या विधानावर चांगलीच टोलेबाजी केली.
“मला अजिबात पक्ष डावलत नाही. पक्षाने मला बोलायला सांगितलं होत, पण मीच तुम्हाला सांगतो की बराच कार्यक्रम लांबला होता ३ वाजेपर्यंत कोणी जेवलेलं नव्हतं पवार साहेबांचं मार्गदर्शन होत आणि अध्यक्षीय भाषणाची आम्ही वाट पाहत होतो. कार्यकर्ते देखील नाराज नसल्याचं स्पष्ट मत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केलं. बारामती मॉडेलसाठी सगळीकडे शरद पवारांचेच फोटो का असतात यावरून अजित दादांनी थेट भाजपच्या नेत्यांना आव्हान दिल.
आज तो पक्ष मोदींवरच चालेल आहे हे कोणी नाकारू शकत नाही. मोदींचा फोटो लावतात म्हणूनच हे निवडून येतात. यातल्या एकाने तरी मोदी साहेबांचा फोटो न लावता निवडून येऊन दाखवावं,आहे का कोणाची धमक ? असं आव्हानच दादांनी यावेळी भाजप नेत्यांना दिल्याचे पाहायला मिळाले.