नवी दिल्ली : देशात करोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आटोक्यात आलेला करोना आता पुन्हा डोके वर काढत असल्याचे दिसत आहे. मागच्या 24 तासांत 8 हजारापेक्षा जास्त रुग्णांची भर पडली आहे. त्यातच सक्रिय रुग्णांची संख्या 40 हजार 370 वर पोहोचली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत 10 जणांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 4 हजार 216 लोक करोनापासून बरे झाले असून, त्यानंतर बरे होण्याचा आकडा 4 कोटी 26 लाख 48 हजार 308 वर गेला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून देशात करोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाली होती, मात्र बुधवारी 93 दिवसांनंतर एका दिवसात पाच हजारांहून अधिक रुग्ण आढळले. आज हा आकडा 8 हजारांच्या पुढे गेला आहे.
#COVID19 | India reports 8,329 fresh cases, 4,216 recoveries, and 10 deaths in the last 24 hours.
Total active cases are 40,370 pic.twitter.com/svqgvbjtpx
— ANI (@ANI) June 11, 2022
देशातील एकूण बाधितांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, हा आकडा 4 कोटी 32 लाख 13 हजार 435 वर पोहोचला आहे. त्याच वेळी, या महामारीमुळे प्राण गमावलेल्या लोकांची संख्या 524,757 झाली आहे.
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत अँटी-करोनाव्हायरस लसींचे 194 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. काल 15 लाख 08 हजार 406 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत 194 कोटी 92 लाख 71 हजार 111 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत. भारतात पुन्हा एकदा करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे.