पुणे : रेंगाळलेला मान्सून अखेर सक्रिय झाला असून राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने जोरदार एंट्री केली आहे. काल कोकणात मान्सूनने हजेरी लावली आता मान्सूनची पुढील वाटचाल देखील वेगाने होत असून आज दिनांक 11 रोजी मान्सून मुबईत दाखल झाला आहे. हवामान तज्ञ् के एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आज मान्सून डहाणू, मुंबई, ठाणे, रायगड, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पुण्यापर्यंत आणि कर्नाटकातील गदगपर्यंत हजर झाला आहे. लवकरच मान्सून संपूर्ण राज्य व्यापेल अशी माहिती आहे.
11 जून.
मुंबईत मान्सूनचे स्वागत… 🌧☔☔
Monsoon in Mumbai arrived.आज 11 जून रोजी डहाणू, मुंबई, ठाणे, रायगड, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पुण्यापर्यंत आणि कर्नाटकातील गदगपर्यंत व पुढे खाली दर्शविल्या प्रमाणे मान्सूनचे आगमन झाले.
– IMD pic.twitter.com/DoqIkrxhoy— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 11, 2022
खरिपाची लगबग
मान्सून आणि शेतकरी यांचे घट्ट नाते आहे. खरीप हंगामासाठी शेतकरी आतुरतेने मान्सूनची वाट पाहत असतो. यंदाच्या वर्षी जरी चांगला पाऊस होणार असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असला तरी म्हणावा तसा पूर्व मोसमी पाऊसही झालेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र आता पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्ग खरीप हंगामाच्या कामाला लागला आहे.
पुण्यात पावसाची जोरदार एंट्री
दरम्यान, काल 10 जून ला पुण्यात संध्याकाळनंतर पावसाने मेघगर्जनेसह हजेरी लावली. त्यामुळे आतुरतेने पावसाची वाट पाहणाऱ्या पुणेकरांना मोठा दिलासा मिळला. अचानक झालेल्या पावसामुळे चाकरमान्यांची धावपळ झाली.काल झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. तर शहरातील रस्त्यांवर पाणी साचले. तर काही ठिकणी झाडे उन्मळून पडण्याच्या देखील घटना घडल्या.