89 कोरोना संक्रमितांची नव्याने भर
बारामती (प्रतिनिधी) – बारामती शहर व तालुक्यात नव्याने 89 कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे. बारामतीत एकूण रुग्ण संख्या अकराश1198 इतकी झाली असून 556 रुग्ण आत्तापर्यंत बरे झाले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी दिली.
काल बारामती मध्ये एकूण घेतलेल्या शासकीय व खाजगी प्रयोगशाळेत 89 कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले. शहरातील63 व ग्रामीण भागातील 26 रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. बारामती रुग्णसंख्या- 1198 एवढी झाली आहे. 44 कोरोना संक्रमित यांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. तर 556 कोरोना संक्रमीत रुग्ण बरे झाले आहेत.
बारामती शहर व तालुक्यात कोणाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही कामासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. सॅनीटायझर तसेच मास्कचा वापर करावा. असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.