नगर – जिल्ह्यात आज 452 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 42 हजार 880 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 90.64 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजल्यापासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्ण संख्येत 452 ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 3688 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 75, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 71 आणि अँटिजेन चाचणीत 306 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 20, कर्जत 1, कोपरगाव 3, नगर ग्रामीण 6, नेवासे 5, पारनेर 4, पाथर्डी 6, राहाता 1, राहुरी 5, संगमनेर 5, श्रीगोंदा 4, मिलिटरी हॉस्पिटल 20, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 71 रुग्णांची नोंद एकूण रुग्णसंख्येत घेण्यात आली. यामध्ये मनपा 20, अकोले 2, कोपरगाव 2, नगर ग्रामीण 6, नेवासे 3, पारनेर 2, पाथर्डी 2, राहाता 15, राहुरी 13, संगमनेर 1, श्रीरामपूर 5 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटिजेन चाचणीत आज 306 जण बाधित आढळून आले.
यामध्ये, मनपा 15, अकोले 13, जामखेड 36, कर्जत 22, कोपरगाव 13, नगर ग्रामीण 7, नेवासे 9, पारनेर 14, पाथर्डी 31, राहाता 50, राहुरी 9, संगमनेर 29, शेवगाव 25, श्रीगोंदा 21, श्रीरामपूर 11, कॅन्टोन्मेंट 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 31, अकोले 51, जामखेड 35, कर्जत 34, कोपरगाव 13, नगर ग्रा. 1, नेवासे 37, पारनेर 41, पाथर्डी 17, राहाता 34, राहुरी 32, संगमनेर 31, शेवगाव 26, श्रीगोंदा 14, श्रीरामपूर 17, कॅन्टोन्मेंट 2, अशा रुग्णांचा समावेश आहे.