नारायणगाव -मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगिती मुळे तसेच सारथी व प्रलंबित मागण्यांना जबाबदार असणारे लोकप्रतिनिधी खासदार अमोल कोल्हे यांच्या नारायणगाव येथील संपर्क कार्यालया बाहेर मराठा क्राती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
जागे व्हा, जागे व्हा खासदार साहेब जागे व्हा, एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देत आक्रोश आंदोलन करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाचे निवेदन खासदार कोल्हे यांचे बंधू दिलीप कोल्हे यांनी स्वीकारले. खासदार कोल्हे यांनी पंतप्रधान यांना दिलेल्या निवेदनाची माहिती दिलीप कोल्हे यांनी आंदोलकांना दिली.
त्याची एक प्रत मोर्चाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आली. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक मारुती भापकर, जीवन बोराडे, प्रतीक इंगळे, सागर तापकीर, अभिषेक म्हसे, निलेश शिंदे, मनोज मोरे, दत्तात्रय शिंदे, अक्षय जरे, महेश गीते, सौरभ जरे, स्वप्नील राहणे यांसह अनेक कायकर्ते उपस्थित होते.