इंदूर : हनी ट्रॅप स्कॅंडलमध्ये 12 अती वरीष्ठ अधिकारी आणि चार माजी मंत्री अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्याचवेळी विशेष पथकाच्या चौकशीत कनिष्ठ मध्यमवर्गातील किमान 24 महाविद्यालयीन विद्यार्थीनींना यासाठी भाग पाडल्याची कबुली या स्कॅंडलची सुत्रधार असणाऱ्या महिलेने दिली आहे.
लक्ष्य बनवण्यात आलेल्या व्हीआयपींकडून करोडो रुपयांची कॉंट्रॅक्ट मिळवणे याच हेतूने हा सेक्स ट्रॅप रचला. मोठ्या नामवंत कंपन्यांना दलाली घेऊन मुख्य सुत्रधार श्वेता जैन आणि आरती दयाल या महिलांनी ही कॉंट्रॅक्ट दिली. याशिवाय आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची कामे ती करवून घेत होती. त्यासाठी महाविद्यालयात जाणाऱ्या तरूणींना जबरदस्तीने त्यांच्या वडिलांच्या वयाच्या माणसांसोबत शय्यासोबत करण्यास पाठवले, असे श्वेताने तिच्या जबाबात सांगितले आहे.