जेजुरी- राज्य बॅंक घोटाळाप्रकरणी ईडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर शासनाच्या वतीने सूडबुद्धीने होत असल्याच्या कारवाईचा निषेध म्हणून शुक्रवारी (दि. 27) जेजुरी बंदला जेजुरीकर नागरिकांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला.
जेजुरी शहर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व संभाजी ब्रिगेडच्या वतीने जेजुरी बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. सकाळी याबाबत जेजुरी येथील शिवाजी चौकात निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार अशोक टेकवडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुरंदर तालुकाध्यक्ष माणिक झेंडे पाटील, जेजुरी पालिकेचे गटनेते सचिन सोनवणे, विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई, रोहिदास कुंभार, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भोसले, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष लोकेश सावंत, जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉ. रामदास कुटे, माजी सरपंच संभाजी काळाणे, सुनील असवलीकर, माजी नगरसेवक महेश दरेकर हेमंत सोनवणे, मेहबूब पानसरे, विक्रम फाळके, उपनगराध्यक्ष गणेश निकुडे ,नगरसेवक अजिंक्य सोनवणे, महेश दरेकर, बाळासाहेब सातभाई, उमेश जगताप, सागर भोसले, वैभव कोरपड, सुधीर गोडसे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेजुरी शहराध्यक्ष एन. डी. नाना जगताप यांनी मानले.