Fact Check: … अन् वाहून गेलेल्या विहिरीचे सत्य उलगडले

बारामती (प्रतिनिधी): बारामती शहरांमधून वाहत असणाऱ्या कऱ्हा नदीला अनेक वर्षानंतर मोठा पूर आला होता. दरम्यान काल नदीच्या प्रवाहात विहिरीची कडा वाहत जाताना अनेकांनी पाहिला होता यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या अनेकांनी ही घटना आपल्या मोबाईल मध्ये कैद केली होती. अनेक माध्यमांमध्ये विहीर वाहून जात असल्याच्या बातम्या झळकल्या होत्या. मात्र या विहिरीचे सत्य उलगडले आहे. बारामती तालुक्यातील मेडद या गावातील बबन गावडे यांनी त्यांच्या घरासमोर व  गोठ्यासमोर सिमेंट काँक्रीटची भली मोठी टाकी बांधली होती. दीड लाख लिटर क्षमतेची व अडीच लाख रुपये खर्च करून त्यांनी ही टाकी बांधली होती.

ही सिमेंट कॉंक्रीटची टाकी त्यांनी शेतीच्या पाण्यासाठी व गाई गुरांना पाण्याची सोय व्हावी यासाठी  एक वर्षापूर्वी बांधली होती. काल झालेल्या पुराच्या पाण्यामुळे नदी लगतच असलेली ही टाकी पुराच्या पाण्यात कडून वाहून गेली.

या टाकीत पाणी नव्हते त्यामुळे ही टाकी पाण्याच्या प्रवाहात तरंगत पुढे वाहत गेली.आणि बारामती शहरातील एका पुलाच्या खाली जाऊन अडकली, सध्या या टाकीला पाहण्यासाठी बारामतीकर गर्दी करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.