नगर – डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे कोर पायथॉन या आधुनिक संगणक प्रोग्रामींग लॅग्वेज या विषयावर दि. 28 जून ते 4 जुलै या दरम्यान राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई येथील थाडोमल सहानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तंत्रज्ञ मनोज एस.कवेडिया हे या कार्यशाळेमध्ये ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत पायथॉन या प्रोग्रामींग लॅग्वेजमधील सर्व मूळ संकल्पना समजावून सांगण्यात येणार आहेत. कार्यशाळेत प्रत्येक दिवशी शिकविलेल्या संकल्पनेवर एक तासाची ऑनलाईन परीक्षा सुध्दा घेण्यात येणार आहे.
कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी अंतिम परीक्षा ऑनलाईन घेतली जाईल. या कार्यशाळेसाठी आतापर्यंत 1 हजार 21 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापुढील नोंदणी करण्यासाठी कार्यशाळी समन्वयक प्रा. गणेश डहाणे यांच्याशी संपर्क साधावा. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. दीपक विधाते यांचे तांत्रिक मार्गदर्शन लाभत आहे. डॉ. विखे पा. फांउडेशनचे प्रा. सुनिल कल्हापुरे, प्रा. डॉ. उदय पी. नाईक यांनी या कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.