Indian Premier League 2024 (Live Cricket Score, GT vs RCB) : आयपीएल 2024 मध्ये आजही दोन सामने खेळवले जाणार आहेत. सुपर संडेचा पहिला सामना व IPL 2024 चा 45 वा रोमांचक सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळला जात आहे. आरसीबीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर गुजरात टायटन्सने 20 षटकांत तीन गडी गमावून 200 धावा केल्या आहेत. गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजयासाठी 201 धावांचे लक्ष्य दिले आहे. या सामन्यात साई सुदर्शन आणि शाहरुख खान यांनी धमाकेदार कामगिरी करत अर्धशतके झळकावली.
Innings Break!#GT set a 🎯 of 2️⃣0️⃣1️⃣ with counter attacking fifties from the middle order! 👌
Chase starts 🔜 with #RCB on the hunt for consecutive wins! 🙌
Scorecard ▶️ https://t.co/SBLf0DonM7#TATAIPL | #GTvRCB pic.twitter.com/3ZvPpkYdPX
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2024
सलामीला फलंदाजीला आलेला रिद्धिमान साहा केवळ पाच धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याला स्वप्नील सिंगने बाद केले. तर कर्णधार गिल 16 धावा करू शकला. या सामन्यात पुनरागमन करणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलने त्याला बाद केले. तिसऱ्या विकेटसाठी साई सुदर्शन आणि शाहरुख खान यांच्यात 86 धावांची भागीदारी झाली जी सिराजने मोडली. 15 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर या वेगवान गोलंदाजाने शाहरुखला बाद केले. तो 30 चेंडूत 193 च्या स्ट्राईक रेटने 58 धावा करून परतला. यादरम्यान त्याच्या बॅटमधून तीन चौकार आणि पाच षटकार आले. त्याने आपल्या T20 कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. त्याने 24 चेंडूत आयपीएलमधील पहिले अर्धशतक झळकावले.
त्याचबरोबर सुदर्शनही मागे राहिला नाही. या सामन्यात त्याने आयपीएल कारकिर्दीतील सहावे अर्धशतक झळकावले. यासाठी त्याने 34 चेंडूंची मदत घेतली. सुदर्शनने मिलरसोबत चौथ्या विकेटसाठी 69 धावांची नाबाद भागीदारी केली. सुदर्शनने 49 चेंडूत 84 धावांची दमदार खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून आठ चौकार आणि चार षटकार आले. त्याचवेळी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या डेव्हिड मिलरने 19 चेंडूंचा सामना करत 26 धावा काढल्या.
आरसीबीकडून गोलंदाजी करताना स्वप्नील सिंगने 3 षटकात 23 धावा दिल्या आणि 1 बळी घेतला. मोहम्मद सिराजने 4 षटकात 34 धावा देत 1 बळी घेतला. मॅक्सवेललाही एक यश मिळाले. त्यानं 3 षटकात 28 धावा दिल्या