दहशत माजवणाऱ्या दोघांना अटक

पिंपरी – तलवार हातात घेऊन आराडा-ओरडा करत दहशत माजविणाचा खळबळजनक प्रकार निगडी ओटा स्कीम परिसरात घडला होता. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत दोन जणांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे, तर दोन जण पोलिसांना पाहून पळून गेले. पकडलेल्या दोघांकडून पोलिसांनी दोन तलवारी जप्त केल्या आहेत.
ही कारवाई निगडी पोलिसांनी सोमवारी (दि.20) रोजी रात्री पावणेआठच्या सुमारास निगडी ओटास्कीम येथील पीसीएमसी कॉलनी बिल्डींगच्या जवळ केली.

याप्रकरणी निगडी पोलिसांनी निखिल साहेबराव साठे (वय 25, रा.पत्राशेड चिकन चौक, दळवीनगर, निगडी) आणि राजेश रामू लष्करे (वय 20, रा. गणेश प्रोव्हिजन स्टोअर्स शेजारी राजनगर ओटास्कीम निगडी) या दोघांना अटक केली असून लखन कैलास सातव आणि शिवा कसबे हे दोघे फरार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री पावणेआठच्या सुमारास निगडी ओटास्कीम येथील पीसीएमसी कॉलनी बिल्डींगच्याजवळ काही तरुण हातात तलवारी घेऊन परिसरात गोंधळ घातला असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली होती. यावर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेत निखिल आणि राजेश या दोघांना दोन तलवारीसहित अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)