सायकल ट्रॅकवर वाहने, राडा-रोडा अन्‌ कचरा

प्रशासनाचे दुर्लक्ष ः सुरू होण्यापूर्वीच “सायकल ट्रॅक’ची दूरवस्था

पिंपरी – पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी तथा प्रदूषणावर नियत्रंण ठेवण्यासाठी सायकलला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड शहरात उभारण्यात आलेल्या सायकल ट्रॅक योजनेला आरंभापूर्वीच समस्यांचे ग्रहण लागले आहे. प्राधिकरणाच्या हद्दीत उभारण्यात आलेल्या सायकल ट्रॅकचा वापर वाहन पार्किंग, राडा-रोडा व कचरा टाकण्यासाठी केला जात असून सायकल ट्रॅक फक्‍त नामफलकापुरते उरले आहेत. प्राधिकरणातील क्षेत्रात विविध ठिकाणी सायकल ट्रॅक, सायकल शेअरिंगसारखा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. मात्र, काही दिवसातच या योजनेचा फज्जा
उडाला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून सुमारे 22 लाखांचा आकडा गाठला आहे. गेल्या एका वर्षात शहरात नवीन 99 हजार दुचाकी वाहनांची भर पडली असल्याची नोंद आरटीओ कार्यालयात झाली आहे. माणसे तितकी वाहने झाल्याने शहरात वाहतूक कोंडी व प्रदुषणाचा प्रश्‍न जटील होत चालला आहे. यामुळे सायकल याच गोष्टींना दिलासा म्हणून सायकल शेअरिंग योजना आणण्यात आली. मात्र, महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही योजना बारगळतांना दिसत आहे. प्राधिकरणाच्या हद्दीतील काळेवाडी फाटा, शाहूनगर, स्पाईन रस्ता, चिखली आदी परिसरात रस्त्यालगत सायकल ट्रॅक विकसित करण्यात आला आहे. मात्र, सायकल ट्रॅकची योजना सुरू होण्यापूर्वीच तीच्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

लाखो रुपये खर्च करुन निर्माण करण्यात आलेले सायकल ट्रॅक केवळ नामफलकापुरते उरले आहे. केवळ कागदोपत्री दाखवण्यासाठी हा ट्रॅक निर्माण करण्यात आला असून अंमलबजावणी काहीच नसल्याचा आरोप व नाराजी संबधित परिसरातील स्थानिकांकडून व्यक्‍त केली जात आहे. बहुतांश ठिकाणी सायकल ट्रॅकवर वाहने लावण्यात आली असून, काही ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. जाधववाडी येथील सायकल ट्रॅकचा वापर होत नसल्याने तो तसाच पडून आहे. काळेवाडी फाटा येथे उभारण्यात आलेल्या सायकल ट्रॅकवर राडारोडा टाकण्यात आला आहे. तसेच, त्या ट्रॅकवर अनधिकृतपणे खासगी वाहनांची पार्किंग केली जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)