#Video : तणावाखाली आणण्यासाठीच भुजबळ, आव्हाडांच्या सुरक्षेत कपात : आ. शिंदे

कराड – माजी उपमुख्यमंत्री आणि माजी गृहमंत्री छगन भुजबळ हे परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून सरकारवर तुटून पडले आहेत. त्यामुळे सरकार हडबडले आहे. भुजबळ, जितेंद्र आव्हाड यांना तणावाखाली आणण्यासाठीच सरकारने त्यांच्या सुरक्षेत कपात केल्याचा आरोप आ. शशिकांत शिंदे यांनी केला आहे. येथील प्रीतिसंगम परिसरात सुरू असलेल्या पंचायत समिती सदस्यांच्या साखळी उपोषणाला भेट दिल्यानंतर आ. शिंदे पत्रकारांशी बोलत होते.

आ. शिंदे म्हणाले,” देशात सध्या जनता आणि राज्यकर्ते दोघेही सुरक्षित नाहीत. त्यामुळेच राज्यातील विचारवंतांचे खून झाले. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षिततेत सरकारने अचानक कपात केली आहे. अशा लोकांना सुरक्षिततेची गरज असते. परिवर्तन यात्रेतील भुजबळांच्या भाषणांमुळे सरकारला त्यांची भीती निर्माण झाली आहे. त्यापोटी आणि त्यांना तणावाखाली आणण्यासाठी त्यांच्या सुरक्षेत अचानक कपात करण्यात आली आहे”.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माजी उपमुख्यमंत्री आणि माजी गृहमंत्री असणार्‍या भुजबळांसह जितेंद्र आव्हाड यांना पूर्वीप्रमाणे सुरक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

https://www.facebook.com/edainikprabhat/videos/2269785233261941/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)