फेरमतदानाची मागणी फेटाळली

जिल्हाधिकारी व निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांचा निर्णय

नगर – नगर-राहुरी मतदार संघातील पाथर्डी तालुक्‍यातील शिराळ चिचोंडी येथील मतदान केंद्रावर फेर मतदान घेण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व केंद्रीय निवडणूक आयोगाचे निरीक्षक युवराज नरसिंहन यांनी फेटाळून लावली. शिराळ-चिचोंडी (ता.पाथर्डी) येथील मतदान केंद्रावर तीन वाजल्या पासून मतदान यंत्रे बंद पडल्याने चिचोंडी-शिराळ केंद्रावर फेर मतदान करावे अशी मागणी राष्ट्रवादीच्या वतीने ऍड. प्रसन्न जोशी यांनी केली होती.

मतदान केंद्रावरील शेकडो मतदारांना मतदान न करताच परतावे लागले आहे. त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जोशी यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कडे लेखी तक्रार दिली होती. या निवेदनावर बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व केंद्रीय निवडणूक आयोगाचे निरीक्षक युवराज नरसिंगन यांच्या समोर सुनावणी झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)