नगर – श्रीगोंदा, पारनेर, राहुरी, जामखेड तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. याकारवाईत जेसीबी, ट्रॅक्टरसह 1 कोटी 4 लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात 14 जनांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारनेर पोलीस ठाण्याहद्दीत विना क्रमांक डंपर व चार ब्रास वाळू असा 20 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी अफजल समीर पठाण, (वय-29, रा. ढोकी, ता. पारनेर), वैभव बाळासाहेब पायमोडे (रा.टाकळी ढोकेश्वर), इमाम हसन सिद्दीकी, गणेश लंके), बेलवंडी पोलीस ठाण्याहद्दीत एक विना क्रमांकाचे ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले.
राहुरी तालुक्यातील राहुल बाबासाहेब जाधव (रा. राजवाडा, राहुरी), अंकूश भगवान जाधव, वय-29, जमीरम सय्याद, दोघे रा.चिखलठाण), जामखेड मधील दत्ता शहाजी मेहेत्रे, हनुमंत नानासाहेब डोके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. तर अकोले तालुक्यातील विना क्रमांकाचा टेंम्पो व त्यामध्ये अर्धाब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.