Youth Killed in New York। अमेरिकेतील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या न्यूयॉर्क शहरातील एका इमारतीत भीषण आग लागली. या अपघातात 27 वर्षीय भारतीय नागरिकाचा तरुणाचा मृत्यू झाला आहे. फाजील खान असे मृत मुलाचे नाव आहे. दरम्यान, न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासाने या घटनेनंतर मदतीचा हात पुढे केला.
न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासाने पीडितेच्या कुटुंबीय आणि त्याच्या मित्रांशी संपर्क केला आहे. जेणेकरून अंतिम निरोप देण्यासाठी मृतदेह लवकरात लवकर भारतात पाठवला जाऊ शकतो. भारतीय दूतावासाने या संबंधी एक ट्विट केलंय. यात त्यांनी ‘न्यूयॉर्कच्या हार्लेम भागात लागलेल्या आगीत आपला जीव गमावलेल्या २७ वर्षीय फाजिल खानच्या मृत्यूची बातमी ऐकून दुःख झाले. दूतावास फाजीलचे कुटुंब आणि मित्रांच्या संपर्कात आहे. त्यांचे पार्थिव भारतात पाठवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करत आहोत. “असे म्हटले आहे.
कोण आहे फाजील खान? Youth Killed in New York।
न्यूयॉर्कमध्ये मारला गेलेला फाजील खान कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या टीचर्स कॉलेजमध्ये आधारित हेचिंगर रिपोर्टसाठी डेटा रिपोर्टर म्हणून काम करत होता. Linkedin वर लिहिलेल्या बायोनुसार, फाझिलने कोलंबिया जर्नलिझम स्कूलमधून पदवी प्राप्त केली आहे. येथून त्यांची शाळेच्याच ग्लोबल मायग्रेशन प्रोजेक्टसाठी पोस्ट ग्रॅज्युएट फेलो म्हणून निवड झाली. 2018 मध्ये बिझनेस स्टँडर्डमध्ये कॉपी एडिटर म्हणून त्यांनी करिअरला सुरुवात केली. यानंतर त्यांनी दिल्लीतील CNA-News18 मध्ये बातमीदार म्हणून काम केले. फाजील 2020 मध्ये न्यूयॉर्कला अभ्यासासाठी आला होता.
इमारतीला आग कशी लागली? Youth Killed in New York।
न्यूयॉर्क अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, शहरातील हार्लेम भागात असलेल्या सहा मजली इमारतीमधील अपार्टमेंटमध्ये ठेवलेल्या लिथियम-आयन बॅटरीमुळे ही ठिणगी पडली. यामुळे आग प्रथम एका अपार्टमेंटमधून लागली. आगीत भाजल्याने फाजील खानचा मृत्यू झाला, तर १७ जण जखमी झाले. तिसऱ्या मजल्यावरील अपार्टमेंटमधून आग लागल्याचे बोलले जात आहे. अग्निशमन विभागाने 18 जणांना वाचवले, त्यापैकी 12 जणांना तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. 4 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे, तर फाजील नावाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.