नवी दिल्ली : काश्मीरचा फुटीरावादी नेता यासिन मलिक सध्या तिहार कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. दरम्यान,आपल्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा तपास योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोप यासिन याने केला आहे. त्याच्याच विरोधात यासिन सध्या कारागृहात उपोषणाला बसला आहे. दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारल्याबद्दल यासिन मलिकला दिल्ली न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
काश्मीर फुटीरतावादी नेता यासिन मलिकला राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने दहशतवादी फंडिंग प्रकरणात दोषी ठरवले आहे. मलिकने दहशतवादासाठी फडिंग केल्याचे आरोप स्वीकारल्यानंतर दिल्ली न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
मलिकवर गुन्हेगारी कट रचणे, देशाविरुद्ध युद्ध पुकारणे, इतर बेकायदेशीर कारवाया आणि काश्मीरमधील शांतता भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे.. यापूर्वी २०१७ मध्ये मलिकला काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद आणि फुटीरतावादी कारवायांशी संबंधित प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते.
यासीन मलिक हा जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट (जेकेएलएफ) या प्रतिबंधित संघटनेचा प्रमुख आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची कन्या रुबिया सदई यांचे ३१ वर्षांपूर्वी अपहरण करण्यात आले होते त्याप्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने जम्मू-काश्मीर मुक्ती संघटनेचे (जेकेएलएफ) नेते यासिन मलिक आणि अन्य नऊ जणांविरुद्ध आरोप निश्चित केले आहेत. या प्रकरणी नुकतीच मलिकची सीबीआय न्यायलयात सुनावणी घेण्यात आली.