मुंबई : देशभरात करोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. या सर्वात दिलासादायक बाब म्हणजे, करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा सबव्हेरियंट बीए.5 ची लागण झाल्याले रुग्णाची नोंद करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाकडून या माहितीला दुजोरा देण्यात आला आहे. दोन रुग्णांना ओमायक्रॉनचा सबव्हेरियंट बीए.5 ची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोन रुग्णांचे नमुने एनआयव्ही पुण्यात पाठवण्यात आले होते, तसेच असेदेखील जात आहे कि, दोन्ही रुग्ण महाराष्ट्राच्या बाहेरील आहेत. सध्या व्यावसायिक कारणास्तव पुण्याच्या ग्रामीण भागांत वास्तव्यास आहेत.
आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, दुबईहून परतल्यानंतर पुणे विमानतळावर नियमित तपासणी दरम्यान या दोन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले होते. आरोग्य विभागाने पुढे बोलताना म्हटले की, सध्या, दोन्ही बाधित रुग्णांमध्ये, कोणत्याही प्रकारची लक्षणं दिसून आलेली नाहीत. त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यानंतर ते करोनामुक्त झाले आहेत.
महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या BA.4 आणि BA.5 सब-व्हेरियंट्सच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ होत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत Omicron च्या BA.4 आणि BA.5 सब-व्हेरियंट्सच्या रुग्णांची संख्या 160 वर पोहोचली आहे. त्यात पुण्यातील 93, मुंबईतील 51, ठाण्यात 5, नागपूरमधील 4, पालघरमधील 4 आणि रायगडमधील 3 जणांचा समावेश आहे.