मुंबई – राज्यात पुन्हा एकदा करोनाचा उद्रेक होताना दिसत आहे. मुंबईत करोनाची तिसरी लाट धडकली आहे. त्यातच राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनाही करोनाची लागण झाली आहे. याबाबत यशोमती यांनी स्वत: ट्विटरवर माहिती दिली आहे.
यशोमती ठाकूर ट्विटरवर म्हणाल्या, माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली करोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.