WPL 2024 Auction On December 9 In Mumbai : महिला प्रीमियर लीग (डब्लूपीएल) च्या 2024 च्या आवृत्तीसाठी खेळाडूंचा लिलाव 9 डिसेंबर रोजी मुंबईत होणार असल्याची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी केली. ‘डब्लूपीएल’चा दुसरा टप्पा पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये होऊ शकतो. मुंबई इंडियन्स गतविजेते आहेत, त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सचा 7 गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले होते.
मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स या पाच फ्रँचायझींनी 60 क्रिकेटपटूंना लिलावापूर्वी कायम ठेवले आहे, ज्यात 21 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. सध्याच्या संघातील एकूण 29 खेळाडूंना करारातून मुक्त करण्यात आले आहे.
दिल्ली कॅपिटल्स :
कायम खेळाडू- अॅलिस कॅप्स, अरुंधती रेड्डी, जेमिमाह रॉड्रिग्स, जेस जोनासेन, लॉरा हॅरिस, मारिजाने कॅप, मेग लॅनिंग, मीनू मणी, पूनम यादव, राधा यादव, शफाली वर्मा, शिखा पांडे, स्नेहा दीप्ती, तानिया भाटिया, तितास साधू.
रिलीज खेळाडू: अपर्णा मंडल, जसिया अख्तर, तारा नॉरिस.
गुजरात दिग्गज :
कायम खेळाडू- अॅशले गार्डनर, बेथ मुनी, दयालन हेमलता, हरलीन देओल, लॉरा वोलवार्ट, शबनम शकील, स्नेह राणा, तनुजा कंवर.
रिलीज खेळाडू: अॅनाबेल सदरलँड, अश्वनी कुमारी, जॉर्जिया वेअरहम, हर्ले गाला, किम गर्थ, मानसी जोशी, मोनिका पटेल, पारुनिका सिसोदिया, सबिनेनी मेघना, सोफिया डंकले, सुषमा वर्मा.
मुंबई इंडियन्स :
कायम खेळाडूः अमनजोत कौर, अमेलिया केर, सी ट्रायॉन, हरमनप्रीत कौर, हेली मॅथ्यूज, हुमैरा काझी, इसाबेल वोंग, जिंतीमनी कलिता, नताली सायव्हर, पूजा वस्त्राकर, प्रियांका बाला, सायका इशाक, यास्तिका भाटिया.
रिलीज खेळाडू: धारा गुजर, हीदर ग्रॅहम, नीलम बिश्त, सोनम.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
कायम खेळाडू: मुख्य पाच फ्रँचायजींकडून एकूण ६० खेळाडू राखीवआशा शोभना, दिशा कसाट, एलिस पेरी, हीदर नाइट, इंद्राणी रॉय, कनिका आहुजा, रेणुका सिंग, रिचा घोष, श्रेयंका पाटील, स्मृती मानधना, सोफी डिव्हाईन.
रिलीज खेळाडू: डेन व्हॅन निकेर्क, एरिन बर्न्स, कोमल जंजाड, मेगन शट, पूनम खेमनार, प्रीती बोस, सहाना पवार.
यूपी वॉरियर्स :
कायम खेळाडूः अॅलिसा हिली, अंजली सरवानी, दीप्ती शर्मा, ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, लॉरेन बेल, लक्ष्मी यादव, पार्श्वी चोप्रा, राजेश्वरी गायकवाड, एस यशश्री, श्वेता सेहरावत, सोफी एक्लेस्टोन, ताहलिया मॅकग्रा.
रिलीज खेळाडू : देविका वैद्य, शबनीम इस्माईल, शिवाली शिंदे, सिमरन शेख.