पुणे – आपल्या हक्कासाठी लढण्याचा अधिकार प्रत्येक समाजाला आहे. परंतु, गावबंदीसारखे मार्ग अवलंबून कोणी हक्कांवर गदा आणू पहात असेल, तर त्याविरोधात आम्ही आवाज उठवू, असा इशारा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिला.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे आयोजित पुरस्कार वितरन कार्यक्रमाला भुजबळ उपस्थित होते. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार रवींद्र धंगेकर, समीर भुजबळ, पंकज भुजबळ, परिषदेच्या पुणे विभागाचे अध्यक्ष प्रीतेश गवळी, प्रदेश महिला अध्यक्षा मंजिरी धाडगे, महाराष्ट्र कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, पुणे महानगर अध्यक्ष पंढरीनाथ बनकर, शब्बीर अन्सारी, माजी सनदी अधिकारी महेश झगडे, दिलीप कांबळे, वैशाली बनकर आदी उपस्थित होते. नागेश गवळी यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. पंढरीनाथ बनकर यांनी आभार मानले.
निधी न दिल्यास आंदोलन…
भिडे वाड्याच्या धर्तीवर महात्मा फुले राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग लवकरच मोकळा व्हावा. यासाठी आगामी काळात निधी उपलब्ध न झाल्यास आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशाराही भुजबळांनी दिला.